मुंबई महानगरपालिकेत कामगार पदांची भरती ! पात्रता फक्त दहावी पास.BMC Recruitment 2026

BMC Recruitment 2026:बृहन्मुंबई महानगरपालिकेतील महाव्यवस्थापक, देवनार पशुवधगृहाच्या आस्थापनेवरील ‘गट-ड’ संवर्गामधील कामगार पदाची ३८ रिक्त पदे सरळसेवेने भरण्याबाबत महानगरपालिका आयुक्त यांची मंजूरी क्र. एमजीसी/एफ/७८७३ दि.०१.१०.२०२५ अन्वये प्राप्त झाली आहे. त्यानुसार महाव्यवस्थापक (देवनार पशुवधगृह) यांच्या आस्थापनेवरील ३८ रिक्त पदे सरळसेवेने भरतीप्रक्रिया राबवून निवड करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून Online पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in/for prospects/Careers-All/Recruitment/ Chief Labour Officer या संकेतस्थळावर प्रसारित करण्यात आलेल्या जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता/पात्रता धारण करीत असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून, त्यासाठी उमेदवारांनी वरील नमूद संकेतस्थळावर ‘कामगार पदाकरिता ऑनलाईन अर्ज’ या लिंकवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज विहित मुदतीत सादर करावेत.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला वैध (Valid) ई-मेल आयडी आणि भ्रमणध्वनी (Mobile Number) असणे आवश्यक आहे.

भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने, भरती प्रक्रियेच्या संपूर्ण कालावधीमध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.

अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा

सरळसेवेने भरावयाच्या ‘कामगार’ पदाचा तपशिल पुढीलप्रमाणे आहेः-

🚨 नोकरी संधी | BMC भरती 2026🚨

बृहन्मुंबई महानगरपालिकेत कामगार (Labour) पदांसाठी सरळसेवा भरती जाहीर!

📌 पदाचे नाव: कामगार – ड गट

📌 एकूण पदे: 38

📌 वेतनश्रेणी: ₹18,000 – ₹56,900 (M-9)

📌 भरती पद्धत: Online अर्ज

📌 अर्ज संकेतस्थळ: portal.mcgm.gov.in

🎯 आरक्षण:

SC / ST / OBC / VJ / EWS / महिला / दिव्यांग / माजी सैनिक यांना शासन नियमानुसार आरक्षण

📢 महत्त्वाचे:

✔️ अर्ज करण्यासाठी वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर आवश्यक

✔️ संपूर्ण अर्ज प्रक्रिया Online

✔️ सविस्तर जाहिरात अधिकृत BMC पोर्टलवर उपलब्ध

👉 अर्ज करण्याची संधी सोडू नका!

👉 आजच अर्ज करा आणि ही पोस्ट आपल्या मित्रांशी शेअर करा.

Leave a Comment