Maharashtra Board Exam 2026:दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षा लवकरच सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर जाताना काही महत्वाच्या गोष्टी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊयात याविषयी सविस्तर माहिती.
भारत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) २०२६ मधील दहावी व बारावी बोर्ड परीक्षांसाठी काही महत्वाचे बदल जाहीर केले आहेत. बारावीची बोर्ड परीक्षा १० फेब्रुवारी २०२६ पासून, तर दहावीची परीक्षा ही २० फेब्रुवारी २०२६ पासून सुरु होणार आहे.
या पार्श्वभूमीवर शाळा आणि परीक्षा केंद्रांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत की, बोर्ड परीक्षांसाठी वापरण्यात येणाऱ्या पसर्व वर्गखोल्यांमध्ये कार्यरत सीसीटीव्ही कॅमेरे असणे अनिवार्य आहे. नव्या नियमांनुसार यंदा नवीन सर्व केंद्रांवर CCTV कार्यान्वित असणार आहेत. त्यामुळे विद्यार्थांनी परीक्षा केंद्रावर जाताना काही आवश्यक बाबींची काळजी घेणे गरजेचे आहेत. चला तर जाणून घेऊयात या महत्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत.
या गोष्टी ठेवा लक्षात
वेळेआधी पोहचा
तुमच्या हॉल तिकिटावर तुमच्या परीक्षा केंद्रांचा संपूर्ण पत्ता असतो. तिथे तुम्ही परीक्षा सुरु होण्याच्या किमान ३० मिनिटे आधी हजार राहणे आवश्यक आहे.
हॉल तिकीट व ओळखपत्र जवळ ठेवा
परीक्षाला जाताना हॉल तिकीट जवळ ठेवा नाहीत त्याशिवाय केंद्रावर प्रवेश मिळणार नाही.
आवश्यक साहित्यच सोबत ठेवा
परीक्षाला जाताना पेन, पेन्सिल, रबर, स्केल इत्यादी आवश्यक साहित्यच सोबत ठेवा.
आवश्यक साहित्यच सोबत ठेवा
परीक्षाला जाताना पेन, पेन्सिल, रबर, स्केल इत्यादी आवश्यक साहित्यच सोबत ठेवा.
सूचना नीट ऐका व पाळा
परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षकांकडून दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करा.
शांतता आणि शिस्त राखा
CCTV कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली परीक्षा होत असल्याने संयम व शिस्त ठेवा.
उत्तरपत्रिका व्यवस्थित तपासा
परीक्षा सुरु झाल्यावर प्रश्न पत्रिका आणि उत्तरपत्रिका दिले जाते. उत्तरपत्रिकेवर नाव, आसन क्रमांक व विषय कोड नीट आणि स्पष्ट लिहा. योग्य लिहिले का हे तपासा.
या गोष्टी टाळा
इलेक्ट्रॉनिक साधने घेऊन जाऊ नका
परीक्षा केंद्रावर मोबाईल फोन, स्मार्टवॉच किंवा इतर इलेक्ट्रॉनिक साधने घेऊन जाणे टाळा.
कॉपी करू नका
कोणत्याही प्रकारची चिट्टी किंवा अनधिकृत साहित्य सोबत ठेवू नका
विद्यार्थ्यांशी बोलणे टाळा
परीक्षाला बसल्यावर इतर विद्यार्थ्यांशी बोलणे टाळा. हे गैरवर्तन समजले जाऊ शकते.